हँड इमोजी वापरता? मग त्याचा अर्थ समजून घ्या
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी व्हॉटस अप डिजिटल मिडियाचा वापर करण्याची सवय अनेकांना पडून गेली आहे. मजकूर जास्त लिहावा लागू नये म्हणून विविध अर्थाचे इमोजी वापरले जातात. हे इमोजी अनेक प्रकारचे आहेत आणि त्यांना काही ना काही संदर्भ किंवा अर्थ आहे. हाताचे इमोजी सुद्धा खूप प्रकारचे आहेत मात्र त्यातील काही आपण वारंवार वापरतो. असे इमोजी वापरतात त्यातून काय संदेश दिला जातो याची माहिती करून घेणे मात्र आवश्यक आहे. अन्यथा दुसऱ्यांचा गैरसमज होण्याची शक्यता निर्माण होते.
कॉल मी फेसचा इमोजी मला कॉल करा असा संदेश किंवा निरोप देणारा आहे. टाळ्या वाजविणारा इमोजी प्रोत्साहन देण्यासाठी, विश करण्यासाठी वापरला जातो. त्याला क्लॅपिंग हँड इमोजी म्हटले जाते. फ्लेस्क्स बायसेप इमोजी म्हणजे दंडाचे स्नायू दाखविणारा इमोजी सक्सेस व पॉवर देण्यासाठी वापरला जातो.
पीस इमोजी गुड नाईट साठी किंवा शांती संदेश देण्यासाठी वापरतात. प्रेअर इमोजी ज्यात दोन्ही हातांचे तळवे जोडून प्रार्थना केली जाते अथवा दुवा मागितल्याचा तो संदेश आहे. ओ.के इमोजी तारीफ करण्यासाठी अथवा ठीक आहे असे सुचविण्यासाठी वापरला जातो. थम्स डाऊन इमोजी, मी तुमच्याशी सहमत नाही किंवा एखादी गोष्ट आवडलेली नाही हे सुचवितो तर थम्स अप इमोजी मी तुमच्या विचाराशी सहमत आहे किंवा तुम्ही जे करतं त्यात तुमच्या सोबत मी आहे हे सुचवितो.