अमेझॉनच्या सिक्रेट वेबसाईटवर अतिशय स्वस्तात होते खरेदी

दिग्गज ई कॉमर्स कंपनी अमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग करणे हा आता अनेकांसाठी नित्याचा भाग बनला आहे. योग्य दरात सामानाची घरपोच डिलीव्हरी मिळत असल्याचे अमेझॉनचा ग्राहक वाढता आहे. करोना काळात अमेझॉनचा व्यवसाय वेगाने वाढला आहे. पण अनेक ग्राहकांना अमेझॉनची एक सिक्रेट वेबसाईट सुद्धा आहे आणि तेथे अन्य वेबसाईटच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी दरात वस्तू खरेदी करता येतात याची माहिती नाही.

लॉकडाऊन काळात दुकाने बंद राहिल्याने अनेकानी अमेझॉनवरून खरेदीचा पर्याय स्वीकारला आहे. येथे सततच काही ना काही ऑफर सुरु असतात. पण अमेझॉनच्या सिक्रेट वेबसाईटवर याच वस्तू आणखी स्वस्त मिळतात. आपण परत केलेल्या, थोड्या खराब झालेल्या अशा वस्तू येथे परत विकल्या जातात त्याही अगदी स्वस्तात. अमेझॉनचे वेअर हाउस अश्या वस्तूंनी तुडुंब भरलेले आहे.

मार्टीन लुईस वेबसाईटच्या ‘मनी सेव्हिंग एक्स्पर्ट डॉट कॉम’ नुसार अमेझॉन, प्रत्येक वस्तूची कार्यक्षमता व भौगोलिक स्थितीचे पूर्ण परीक्षण करून त्यानुसार त्या वस्तूला ग्रेड देते. अमेझॉनच्या सिक्रेट वेबसाईट वरून खरेदी करणाऱ्यांना सुद्धा मुख्य वेबसाईट नुसारच सेवा दिली जाते. त्यात रिटर्न पॉलिसी योजनाही आहे. केलेली खरेदी पसंत पडली नाही तर ३० दिवसाच्या आत परत करून रक्कम परत घेता येते. अश्या ४० हजाराहून अधिक वस्तू या सिक्रेट वेबसाईटवर आहेत. त्यात संगणकापासून, गृहपयोगी वस्तू, खेळणी, इलेक्ट्रिक वस्तू असे अनेक पर्याय आहेत. लोकप्रिय नेसकॅफे सिंगल सर्व्ह कॉफी मशीन येथे २ हजारात मिळते. अन्य वेबसाईटवर त्याची किंमत ५ ते ७ हजार आहे असेही समजते.