सुहाना खान बरोबरच अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरही करणार डेब्यू  

बॉलीवूड मधली एक चांगली दिग्दर्शिका म्हणून नाव असलेली झोया अख्तर आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक ‘आर्ची’ ची भारतीय आवृत्ती तयार करण्याच्या तयारीत आहे आणि त्यात शाहरुख कन्या सुहाना डेब्यू करणार असल्याची बातमी नुकतीच आली आहे. पिंकविलाच्या नव्या बातमीनुसार याच चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि बोनी कपूर, श्रीदेवी यांची धाकटी कन्या खुशी सुद्धा डिजिटल डेब्यू करणार आहेत.

अगस्त्यचा कल नेहमीच अभिनय क्षेत्रात येण्याकडे राहिला आहे. शिक्षण पूर्ण झाले की तो त्याचे हे स्वप्न पूर्ण करणार आहे. मात्र फिल्मी जगतात पारंपारिक एन्ट्री पद्धतीपेक्षा वेगळ्या म्हणजे डिजिटल दुनियेत तो प्रथम झळकणार आहे आणि मग मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

आर्ची मध्ये सुहाना, बेट्टीचा तर खुशी वेरोनिकाचा रोल करणार असल्याची चर्चा आहे. झोया स्क्रिप्ट तयार करत असून या वर्षात ही फिल्म फ्लोरवर जाईल असे समजते.