अमेरिका, ब्राझील मध्ये करोना डेल्टा व्हेरीयंटचा हंगामा

अमेरिकेत करोनाच्या डेल्टा व्हेरीयंटचा धोका खुपच वेगाने वाढत चालला असून सरकारने २० सप्टेंबर पासून सर्व नागरिकांना बुस्टर डोस देण्याची योजना आखली आहे. फारच वेगाने पसरत असलेल्या या व्हेरीयंट मुळे मृतांची संख्या वाढू लागली असून आता ही संख्या दिवसाला एक हजाराहून अधिक झाली आहे. डेल्टा व्हेरीयंट अधिक घातक ठरले आहेच पण जेथे लसीकरण कमी आहे तेथे अधिक मृत्यू होत आहेत असे समजते. गेल्या काही महिन्यात रोजच्या मृत्यूची सरासरी ७६९ होती. पण गेल्या चोवीस तासात १०१७ मृत्यू झाले असल्याने बस, रेल्वे, विमानासह सर्व ठिकाणी मास्क वापराने बंधनकारक केले गेले आहे.

ब्राझील मध्येही डेल्टा व्हेरीयंट ने कहर केला असून गेल्या चोवीस तासात ३७६१३ नवे रुग्ण सापडले आहेत आणि ११०६ मृत्यू झाले आहेत. ब्राझील मध्ये संक्रमितांची एकूण संख्या २०,४१६,१८३ वर गेली आहे आणि मृतांचा आकडा ५,७०,५९८ वर गेला आहे.

न्यूझीलंड मध्ये सहा महिन्यानंतर मंगळवारी पुन्हा एक करोना रुग्ण मिळाल्यामुळे पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन लावला आहे. दरम्यान बुधवारी आणखी सहा नवे करोना रुग्ण मिळाल्याचे सांगितले जात आहे.