जिओ नेक्स्टच्या फोनची किंमत आणि फिचर्स लिक

रिलायंस जिओने त्यांच्या जून मध्ये झालेल्या वार्षिक सभेत सर्वात स्वस्त स्मार्टफोन जिओ नेक्स्ट सादर करत असल्याची घोषणा दिली होती मात्र फोनची किंमत अथवा फिचर्स बाबत माहिती दिलेली नव्हती. गुगलच्या सहकार्याने तयार झालेल्या या फोनची फिचर्स आणि किंमत आता लिक झाली असून १० सप्टेंबर रोजी हा फोन लाँच केला जात आहे.

ट्रिप्सटर योगेश यांच्या म्हणण्यानुसार जिओ नेक्स्ट ३४९९ रुपयात मिळू शकेल. या फोनसाठी अँड्राईड ११ गो एडिशन, ५.५ इंची एचडी डिस्प्ले, २ किंवा ३ जीबी रॅम आणि १६/३२ जीबी स्टोरेज असेल. ग्राफिक्स साठी अॅडर्नो ३० जीपीयु, १३ एमपीचा रिअर आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा, फोर जी व्होल्ट ड्युअल सीम सपोर्ट मिळेल. कॅमेऱ्यासह गुगल लेन्स सपोर्ट असेल आणि अनेक फिल्टर्स असतील. कॅमेऱ्यासह पोर्ट्रेट मोड, स्नॅप चॅट फिचर, गुगल असिस्टंट म्युझिक प्ले, माय जिओ अॅप ओपन असेल. पॉवर व्हॉल्युम साठी फिजिकल बटन आणि नेव्हिगेशन व होम साठी टच सपोर्ट दिला जाईल.