ब्रिटनी स्पिअर्सने सोशल मीडियावर शेअर केला टॉपलेस फोटो


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अमेरिकन गायिका आणि पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सने स्वतःचे काही फोटोज शेअर केले आहेत. हॉट आणि बोल्ड अवतारात या फोटोंमध्ये ब्रिटनी दिसून येत आहे. या फोटोंमध्ये ब्रिटनीच्या हॉटनेसचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. एका फोटोमध्ये ब्रिटनी टॉपलेस दिसून आली. या हॉट फोटोंमध्ये ब्रिटनी तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसून आली. तिने शेअर केल्या या फोटोंवरून आता वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे. काही ब्रिटनी दिवसांपूर्वीच तिचे वडील जेमी स्पिअर्ससोबत सुरू असलेल्या पालकत्व प्रकरणामुळे चर्चेत आली होती.

नेहमीच पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्स ही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड अंदाजातील फोटोज शेअर करत असते. नुकतेच तिने स्वतःचे टॉपलेस फोटोज शेअर फॅन्सना ट्रीट देण्याचा प्रयत्न केला. परंतू तिच्या या प्रयत्नामुळे ती अडचणीत सापडली. तिने शेअर केलेले टॉपलेस फोटोज पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात केली. तिच्या या फोटोंवरून ती प्रेग्नंट असल्याचे तर तिने बूब सर्जरी केल्याचा अंदाज काही युजर्स लावताना दिसून आले. सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याची चर्चा तर अगदी वाऱ्यासारखी पसरली. या चर्चा आणखी जोर धरण्याच्या आधीच ब्रिटनीने समोर येऊन आपले मौन सोडले आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्रिटनीने एक पोस्ट शेअर ती प्रेग्नंट असल्याची केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. तिने यात लिहिले आहे, नाही मित्रांनो, एका आठवड्यात मला कोणतेही बूब्स काम मिळाले नाही आणि मी प्रेग्नंट सुद्धा नाही. मी अन्न खाते म्हणून माझ्या फोटोंमध्ये बुब्स दिसतात. मी माझ्या शरीराचे आणखी फोटो शेअर करण्यापूर्वी माझी त्वचा का दाखवते, हे समजून घ्या. मी लोकांना कितीही समजावले तरी काही लोकांना कधीच समजणार नाही. माझ्या चाहत्यांना माहित आहे की मी हे का करते. कारण ते आश्चर्यकारक आहेत. त्या सर्वांना माझ्याकडून खूप प्रेम…

ती यापुढे बोलताना म्हणाली, माझ्या मते एखादी स्त्री जेव्हा हॉट असते आणि तिला तिच्यावरचा एक थर काढून टाकायचा असेल तेव्हा लगेच लोकांच्या प्रतिक्रिया येत असतात. नाही, मी स्ट्रिप क्लब किंवा परफॉर्मन्सबद्दल बोलत नाही. फक्त मी व्यवहारिकदृष्ट्या सांगते की, तुम्ही कारमध्ये बसलेले असता आणि भर उन्हाळ्यात आपण अंगावर उगाच लांब बाह्याचा शर्ट घातलेला आहे, हे जाणवल्यानंतर तो काढून टाकावा लागतो. पण हे जर एका महिलेने केले, तर लोकांच्या त्वरित प्रतिक्रिया येतात. पण मला खूप चांगले वाटते. म्हणून तुम्ही सुद्धा चांगले दिसाल असे वाटते.

ब्रिटनी तिच्या या पोस्टच्या माध्यमातून महिलांच्या स्वातंत्र्याबाबत आपले विचार मांडले आहेत. परंतू हेच विचार मांडताना तिने अगदी शब्दांना फिरवून आपल मत व्यक्त केले आहे. पण आता ती स्वतः आयुष्य मनसोक्तपणे जगते.