भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) नोकरीची संधी, असा करा अर्ज


मुंबई : कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) विविध रिक्त पदांसाठी नोकर भरती निघाली आहे. येथे एकूण विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती होणार आहे.

पहिली पोस्ट – पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी

  • जागा – 08
  • शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा डिप्लोमा

दुसरी पोस्ट – कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर

  • जागा – 16
  • शैक्षणिक पात्रता : एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप 01 वर्षे
  • वयाची अट : 40 वर्षापर्यंत
  • नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2021 आहे

अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर करिअर्स हा पर्याय निवडून त्यामध्ये न्यू अपॉर्च्यूनिटीज् हा पर्याय निवडावा. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता उपलब्ध होईल.