भारतातील कोरोनाच्या काळातील मृत्यू हे भाजपने घडवलेले हत्याकांड – नाना पटोले


बुलडाणा : जसे जालियानवाला बाग मधील हत्याकांड घडले होते, त्याच पद्धतीने या कोरोनाच्या काळात जे लोक मरण पावले, याला सर्वस्वी जबाबदार भाजप आहे. पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागावी. हे भारतातील कोरोनाच्या काळातील मृत्यू हे भाजपने घडवलेले हत्याकांड असल्याची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दिली आहे.

खामगाव येथे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या विजय संकल्प कार्यक्रमात ते आले, असता त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, तसेच अफगाणिस्तानात जे घडत आहे. ते धार्मिकेतच्या नावावर घडत आहे. तालिबान्यांनी ते ताब्यात घेतले आहे. अनेक अफगणिस्तानातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत. अशा अफगानी विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वस्वी मदत करेल, असेही आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिले.

नाना पटोले काल जालन्यात बोलताना म्हणाले होते की, हे सरकार फार काळ टिकणार नाही असेही भाजपकडून सांगितले जाते. पण महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनी आहे. अमर, अकबर, अँथनी हा चित्रपट त्यांनी बघितला नसेल. अमर, अकबर, अँथनी हे अन्याय, अत्याचाराविरोधात होते. लोकांना न्याय देणारे होते. म्हणून तो चित्रपट हिट झाला होता. तसेच हे सरकार त्याच पद्धतीने जनतेमध्ये हिट होणार असल्याचे त्यांनी म्हटले.