सुहाना खानच्या डेब्यूसाठी झोया अख्तरची तयारी

बॉलीवूड किंग शाहरुखखानची लाडकी कन्या सुहाना स्टार किड् म्हणून पूर्वीपासूनच लोकप्रिय असून आता तिचे हॉट अँड बोल्ड फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. तिचे फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. बॉलीवूड डेब्यू न करता सुद्धा सुहानाचे चाहते खूप आहेत. एकाद्या हिरोईन प्रमाणे सुहाना लोकप्रिय आहे. अशी सुहाना बॉलीवूड डेब्यू कधी करणार याची प्रतीक्षा केली जात असतानाच सुहाना लवकरच चित्रपटात झळकेल अशी बातमी आली आहे.

बॉलीवूड मधील गुणी दिग्दर्शक झोया अख्तर हिने लवकरच सुहानाला लाँच करण्याची तयारी केली असल्याचे पिंकव्हिला च्या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे. झोया आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक ‘आर्ची’ वर चित्रपट बनवीत असून त्याचे भारतीय रूपांतर केले गेले आहे. झोयाची या चित्रपटासाठी पहिली पसंती सुहाना हीच आहे. शाहरुख आणि सुहानाला हे स्क्रिप्ट आवडले तर पेपर वर्क सुरु केले जाणार आहे. सुहाना बरोबरच आणखीही काही तरुण कलाकार झोयाला हवे आहेत कारण ही कथा काही मित्रांची आहे.

अर्थात सुहानाचा हा डेब्यू मोठ्या पडद्यावर नसेल तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर असेल. यापूर्वी सुहाना काही शॉर्ट फिल्म मध्ये दिसली आहे आणि तिला अभिनयातच करियर करायचे आहे. सध्या ती लंडन येथे शिक्षण घेत आहे.