करोनाच्या नव्या व्हेरीयंटना देवी देवतांची नावे मिळणार

करोनाचा उद्रेक झाल्यापासून दर दिवशी त्याचे नवीन प्रकार उघड होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेसमोर निराळाच पेच उभा राहिला आहे. करोनाच्या व्हेरीयंट ना सध्या ग्रीक वर्णमालेतील अक्षरे नावे म्हणून दिली जात आहेत. मात्र ही २४ वर्णाक्षरे संपल्यावर नवीन व्हेरीयंट ना कोणती नावे द्यावीत असा हा पेच आहे. २४ नावे संपल्यावर ग्रह, नक्षत्र, तारे यांच्या बरोबर ग्रीक देवी देवतांची नावे देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे टेक्निकल लीडर व महामारी तज्ञ डॉ. मारिया केरखोव यांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात करोनाची आणखी नवी व्हेरीयंट समोर येण्याची शक्यता आहे. वैद्यानिकांनी दिलेली नावे सर्वसामान्य जनतेला लक्षात ठेवणे अवघड जाते. त्यामुळे ग्रीक वर्णमालेतून दिलेली नावे वैज्ञानिक बदलू शकणार नाहीत.

करोना व्हेरीयंट साठी दिली जात असलेली नावे ही सोयीसाठी असून त्यामुळे जनतेमध्ये सतर्कता वाढायला मदत होते. करोनाची वेगवेगळी व्हेरीयंट वेगवेगळया देशात सापडत आहेत त्यानुसार नावे दिली जाणार आहेत. ज्या देशात करोनाचे व्हेरीयंट प्रथम दिसते त्याला त्या त्या देशाच्या नावावरून ओळखणे तर्कसंगत नाही असेही मारिया यांचे म्हणणे आहे.

वैज्ञानिकांच्या मते मात्र जे व्हेरीयंट ज्या देशात किंवा जागी प्रथम आढळते त्याला त्या स्थानाचे नाव देणेच अधिक योग्य आहे. प्रत्येक विषाणूबद्दल अशीच पद्दत राबविली गेली आहे. इबोलाचे नाव इबोला नदीवरून दिले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र चीनच्या वुहान शहराचा संबंध करोनाशी जोडला जाऊ नये म्हणून करोनाला कोविड १९ असे नाव दिल्याचा आरोप केला जात आहे.