सुवर्णपदक विजेत्या नीरजची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात केले दाखल


नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. तो पदक जिंकल्यानंतर दहा दिवसांनी मंगळवारी पानिपतला पोहोचला. त्याचा ताफा समालखाच्या हलदना सीमेवरून खंडरा गावात पोहोचला. खंडरा येथील कार्यक्रमातूनच नीरजला रुग्णालयात नेण्यात आले.

माध्यमांच्या वृत्तानुसार, नीरजची तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेले आहे. त्याला कोणत्या रुग्णालयात नेण्यात आले, हे अद्याप समोर आलेले. नीरजला याआधी तीन दिवसांपासून ताप होता, परंतु त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. कार्यक्रमस्थळी प्रचंड गर्दी असल्यामुळे कार्यक्रम लवकर संपवण्यात आला.

ताप असण्यासोबत नीरजचा घसाही खवखवत आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे, हरयाणा सरकारने शुक्रवारी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात नीरज भाग घेऊ शकला नाही. तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात जोडला गेला.