विजय माल्ल्याच्या’ किंगफिशर हाउस’ चा लिलाव अखेर झाला

ब्रिटनच्या न्यायालायाने दिवाळखोर म्हणून जाहीर केलेला फरारी उद्योगपती विजय माल्या याच्या मुंबई विमानतळाजवळ विलेपार्ले येथे असलेल्या ‘किंगफिशर हाउस’ या किंगफिशर एअरलाईन्सच्या मुख्यालयाचा लिलाव पार पडला आहे. २०१६ पासून आठ वेळा या इमारतीचा लिलाव करण्याचा प्रयत्न झाला होता पण अपेक्षित किंमत मिळू शकली नव्हती. अखेर हैद्राबाद येथील एका खासगी डेव्हलपरने ५२ कोटी रुपयात ही इमारत विकत घेतली. मार्च २०१६ मध्ये जेव्हा प्रथम ही इमारत लिलावात आली तेव्हा तिची बेस प्राईज १५० कोटी ठरविली गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार नंतरच्या लिलावात ही किंमत १३५ कोटींवर आणली गेली होती पण अखेर ५२ कोटी मध्ये तिची विक्री झाली. डेटा रिकव्हरी ट्रिब्युनने हा लिलाव केला. यापूर्वी कंपनीच्या शेअर विक्री लिलावातून ७२५० कोटींची वसुली केली गेली आहे. लिलाव झालेल्या इमारतीचा एरिया १५८६ चौरस मीटर आहे. आणि ही इमारत चार मजली आहे.

ब्रिटन न्यायालयाने माल्या याला २६ जुलै रोजी दिवाळखोर जाहीर केल्यामुळे एसबीआय सह भारतीय बँका माल्या यांची जगभरातील जप्त करून त्याची विक्री करू शकणार आहेत.