मराठमोळा अभिनेता सचिन आणि पत्नी सुप्रिया, एकच दिवशी वाढदिवस  

मराठमोळा आणि ५० वर्षाहून जास्त काळ अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात प्रसिद्ध असलेला अभिनेता सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस १७ ऑगस्ट रोजी आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी, अभिनेत्री सुप्रिया यांचाही वाढदिवस १७ ऑगस्ट रोजीच असतो. मराठी बरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा सचिन यांनी चांगले यश आणि नाव मिळविले आहे. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे.

सचिन आणि सुप्रिया यांनी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे लग्न टिकणार नाही असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. सचिन तेव्हा २७ वर्षाचा होता तर सुप्रिया अवघी १७ वर्षाची होती. वयातील मोठ्या फरकामुळे हे लग्न यशस्वी होणार नाही असे भाकीत केले जात होते पण आज ३२ वर्षांच्या सहजीवनानंतर सुद्धा ही जोडी अतिशय समाधानाने आणि आनंदाने आयुष्य जगते आहे. त्यांची कन्या श्रिया हिनेही सिनेसृष्टी मध्ये डेब्यू केला आहे.

‘हा माझा मार्ग एकला’ या मराठी चित्रपटातून सचिन प्रथम पडद्यावर आला तेव्हा त्याचे वय होते चार वर्षाचे. त्या वर्षीच त्याने उत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषिक मिळविले होते. ६५ हून अधिक चित्रपटात त्यांनी कलाकार म्हणून भूमिका केल्या असून ५० चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

एक आठवण अशीही सांगतात की शोले या चित्रपटात त्यांनी अहमद ही छोटी भूमिका साकारली होती आणि त्याचे मानधन म्हणून त्यांना एका फ्रीज दिला गेला होता.