एक आयफोन बनण्यासाठी इतका येतो प्रत्यक्ष खर्च

आयफोन कडे नेहमीच लग्झरी स्मार्टफोन म्हणून पाहिले जाते. हे फोन महाग आहेत पण तरी अनेकांना आपण एकदा तरी आयफोन घ्यावा अशी इच्छा असते. आयफोन प्रत्यक्ष तयार होण्याचा खर्च खूप नसला तरी कर, उत्पादकाचा नफा, व अन्य किमती मुळे हा फोन महाग पडतो. एक्स्पोर्ट, असेम्बल केला की त्याची किंमत कमी होते असे समजते.

भारतात आयफोन १२ ची विक्री किंमत १२८ जीबी स्टोरेज साठी ८४९०० रुपये तर ६४ जीबी साठी ७९९९९ रुपये आहे. कौंटरच्या रिपोर्ट नुसार हा फोन बनविण्य्साठी ३०३०० रुपये खर्च येतो. आयफोन ११ च्या तुलनेत आयफोन १२ बनविण्यासाठी येणारा खर्च १२ टक्के जास्त आहे. कारण आयफोन १२ हा फाईव्ह जी फोन आहे. यात ११ फाईव्हजी बँड विडथ असून अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत चांगली कनेक्टीव्हिटी मिळते. बाकी स्मार्टफोन १ ते ५ फाईव्ह जी बँड वापरतात.

आयफोन १२ ला एलसीडी ऐवजी ओएलईडी डिस्प्ले दिला गेला आहे त्यामुळेही या फोनची किंमत वाढली आहे. सेल्फ डिझाईन कंपोनंट म्हणजे एआय ४, पीएमआयसी, ऑडीओ व युडब्ल्यूबी चीप मुळे खर्चात १६.७ टक्के वाढ झाली आहे असेही सांगितले जाते. अमेरिकेत हा फोन ७९९ डॉलर्स म्हणजे ५८६०० रुपयात मिळतो.