पहिल्यांदाच दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन दोघेही चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या आगामी चित्रपटात दोघेही स्क्रिन शेअर करणार आहेत. 26 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज केला जाणार असल्याचे सांगितले जात होते.
ठरलं…! पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार दीपिका-ऋतिक
यापूर्वीच ‘फायटर’चे चित्रिकरण सुरु झाले असून दीपिका आणि ऋतिकची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. ऋतिकने काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक सिद्धार्थ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.
इन्स्टाग्रामवर ऋतिकने शेअर केलेल्या फोटोंमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भातील माहिती वायकॉम 18 स्टुडियोचे प्रोड्यूसर अजीत अंधेरेनं एक ट्वीट करत दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तयार राहा 2023 च्या प्रजासत्ताक दिनी भारताचा पहिला वहिला हवाई अॅक्शनपट फायटरसाठी. ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण बॉक्स ऑफिसवर येत आहेत.
तर इंस्टाग्रामवर ऋतिक रोशनने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ऋतिकसोबत दीपिका पादुकोण, दिग्दर्शक सिद्धार्ध आनंदही आहेत. हा फोटो शेअर करत ऋतिकने लिहिले होते की, ही गँग उडण्यासाठी तयार आहे. #Fighters” ऋतिकच्या कमेंटवर अनेक बॉलिवूडकरांनी कमेंट केल्या होत्या. दीपिकानंही ऋतिकच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, हा! जसे आम्ही ते खाणे पचवतो!