मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून पारशी नववर्ष दिनाच्या शुभेच्छा


मुंबई : – पारशी नववर्ष प्रारंभ नवरोज दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, उद्यमशील, शांतता-सुव्यवस्थेचे भोक्ते, निसर्गपूजक अशा आपल्या पारशी बांधवांसोबतच सर्वांसाठी हे नववर्ष सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, हीच मनोकामना.
पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
तसेच पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारशी बांधवांसह सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल. राज्य आणि देश कोरोनामुक्ततेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करेल, अशा सदिच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पारशी नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचा पहिला दिवस, नवरोज, उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.