अशरफ गनींनी पैशांनी भरलेल्या चार कार्स आणि चॉपर्स घेऊन सोडला देश! रशियन दुतावासाची माहिती


काबूल – तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी कब्जा केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अशाच परिस्थितीत देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीने अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यामुळे अनेक नागरिक नाराज झाले आहे. दरम्यान, आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशरफ गनी हे पैशांनी भरलेल्या चार कार्स आणि चॉपर्स घेऊन पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

अशरफ गनी यांनी पैशांनी भरलेल्या कार आणि चॉपर घेऊन पलायन केल्याचा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेने केला आहे. हे वृत्त रशियाची वृत्तसंस्था RIA आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने देण्यात आले आहे. अशरफ गनी यांना काही पैसे या ठिकाणीच सोडून जावे लागले, कारण ते त्या ठेवू शकत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

रोख रकमेने चार कार्स या भरलेल्या होत्या. त्यानंतर गनी यांनी काही रक्कम चॉपरमध्ये ठेवली. यानंतरही ते आपले पूर्ण पैसे त्यात ठेवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना काही पैस तिकडेच ठेवून निघावे लागले, अशी माहिती रशियाच्या दुतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंशचेन्को यांनी दिली. आपण हे वक्तव्य प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.