मुलांचा कंटाळा घालवण्यासाठी…


घरात लहान मुले असली की त्यांचे मन सतत रमवावे लागते. लहान मुलांना कंटाळाही फार लवकर येतो. सतत काही ना काही नवे करावे लागते. मुलांना सतत कशात तरी गुंतवून ठेवावे, त्यांची करमणूक करणे अवघडच असते आणि जेव्हा आपल्याला काही कामे पार पाडायची असतात तेव्हा मुलांचा कंटाळा घालवणे हे एक आव्हानच असते. लहान मुलांमध्ये खूप उर्जा असते त्यांना सतत कुठेतरी गुंतवून ठेवावे लागते. मुलांनी स्वतःचीच करमणूक करुन घ्यायला शिकले पाहिजे. खालील काही गोष्टीं करून पहा मुलांची करमत नसल्याची तक्रार कमी होईल.

* स्पर्धा लावा म्हणजे सकाळी किती पटकन उठतात आणि पटापट तयार होतात ते पाहूया अशी वेळीची स्पर्धा लावा. रोजची कामे करताना गाणी ऐकून थोडे नाचा. * मुलांना कोणते कपडे घालावे आणि न्याहारीत काय हवे असे निवडीचे स्वातंत्र्य द्या.

* छोट्या छोट्या कामात विभागणी * दिनक्रमात कऱण्याच्या गोष्टी छोट्या छोट्या भागात विभागा. काही गोष्टी कऱणे मुलांना अजिबातच आवडत नसते. म्हणून लहान-लहान भागांत विभागणी करा. एखादा भाग झाला की बक्षीस मिळेल असे सांगा. एखादी गोष्ट पूर्ण कऱण्यासाठी तासनंतास काम करायला लावू नका. * एक काम संपले की गोड खाऊ द्या.

*तीन गोष्टी केल्या तर संध्याकाळी बागेत फिरायला न्या. पाच कामे केल्यास एक तासभर खेळायला परवानगी द्या. * मुलांना करमेनासे झाले की ते आईच्या मागे भूणभूण करते. त्यामुळे त्यांना येणारा कंटाळा त्यांनाच घालवण्यास शिकवा. कारण प्रत्येकवेळी त्यांचा कंटाळा घालवण्यासाठी आणि काही कौशल्य शिका हे सांगण्यासाठी आपण उपलब्ध असूच असे नाही. अर्थात याचा अर्थ पालक काहीच मदत करु शकत नाहीत असे नाही.

* पालक यासाठी नव्या कल्पना समोर मांडूच शकतात . मुलांबरोबर बसून कंटाळा घालवणाऱ्या गोष्टी कागदावर लिहून त्याच्या चिठ्‌ठ्‌या करा आणि एक बरणीत भरून ठेवा. जेव्हा कंटाळा येईल तेव्हा यापैकी एक चिठ्ठी काढून ती गोष्ट करायला सांगा.

Leave a Comment