स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पर्यटन या जागांना भेट देऊन यादगार बनवा


यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला जोडून सुट्या आल्याने अ्रनेकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. अशा वेळी हे पर्यटन यादगार बनविण्यासाठी देशांतील कांही ठिकाणांची भेट नक्कीच उपयोगी ठरू शकते. या जागा निसर्गसुंदर आहेत तर कांही जागांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यातील कांहीची माहिती देत आहोत.

दिल्लीचा लाल पत्थरात उभारला गेलेला कुतुब काँप्म्लेक्स हे असे ठिकाण आहे. जगातील सर्वाधिक उंचीचा विटांमधला मिनार असलेल्या या संकुलातील जगप्रसिद्ध कुतुबमिनार १२ व्या शतकात उभारला गेलेला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील हे स्थळ देशातील प्रभावशाली ठिकाणांतील एक आहे. याच परिसरात असलेला लोहस्तंभ, अला इ दरवाजा, कुव्वत उल इस्लाम मशीद अशा नव्या व प्राचीन इमारती येथे पाहायला मिळतात.


स्पिती घाटी- हिमाचल या निसर्गसुंदर राज्यातील हे स्थान म्हणजे निसर्गसौंदर्याची खाण आहे.१२५०० फूट उंचीवरील व उंच पहाडांच्या विळख्यातील हे ठिकाण जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे.विशेषतः पहाडप्रेमींसाठी हे नंदनवन आहे. रात्रीच्या अंधारात या घाटीचे सौंदर्य वर्णन करणे केवळ अशक्य. चोंहोबाजूंनी वेढलेली बर्फाची शिखरे, ग्लेशियर बौद्धमठ व लांबच लांब रांगात फडकणार्‍या रंगीबेरंगी पताका पाहायला प्रत्यक्षच जायला हवे.


इजुको घाटी हे नागालँडमधील मनोहर ठिकाण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणूनही परिचित आहे. हेमकुंड साहिब जवळ असलेली फुलांची दरी वेगळी. या दरीतही अनेक रंगांची आकारांची फुले डोंगररांगाच्या उतारावर व जमिनीवर इतकी दाट पसरलेली असतात की जणू फुलंचे गालिचे घातले आहेत. निळे आकाश, चहूबाजूची हिरवळ व वाटेवर हे फुलांचे गालिचे पर्यटकांना त्यांच्या सुवासाने मोहवून टाकतात.


शिखांचे श्रद्धास्थान असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला आवर्जून भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. गोल्डन टेंपल नावाने प्रसिद्ध असणार्‍या या मंदिराला दररोज अक्षरशः हजारो पर्यटक भेट देतात, सोन्याच्या पत्र्याने मढविलेले हे मंदिर सूर्यप्रकाशात नुसते चमकत असतेच पण भोवतीच्या प्रंचड सरोवरात ते एखादे सोन्याचे बेट असावे असा भास होतो.

Leave a Comment