देशात फक्त पिथमपूर येथेच बनतात नौसेनेची पदके


फोटो सौजन्य दै,भास्कर
आपल्या देशातील पिथमपूर या गावाची ओळख जरा हटके आहे. या गावात नौसेनेतर्फे दिली जाणारी विविध प्रकारची पदके बनविली जातात. मित्तल अॅप्लायन्सेस लिमिटेड कंपनीकडे हे काम असून चांदी, निकेल अश्या धातूपासून ही पदके बनविली जातात.

भारतीय नौसेना किंवा नाविक दल जगातील पाच नंबरचे मोठे नाविक दल आहे. आपल्या नौसेनेत ६० हजार नौसैनिक तैनात असून देशसेवा, बहादुरी, समर्पण आणि त्याग यांचे दर्शन हे सैनिक घडवीत असतात. त्याच्या या शौर्याचा गौरव करण्यासाठी तसेच विविध प्रसंगी त्यांना पदके दिली जातात. मित्तल अॅप्लायन्सेसचे अध्यक्ष दिनेश मित्तल या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आमच्याकडे नौदलाकडून ६० हजाराहून अधिक पदकांची ऑर्डर आहे. प्रत्येक पदकाचे वजन ३५ ग्राम असते आणि त्यासाठी ५ हजार किलो धातूचा वापर होईल. १ दिवसात साधारण ६ हजार पदके तयार होतात. या पदकांवर अशोक स्तंभ असतो.

विविध प्रकारच्या पदाकांविषयी सांगताना ते म्हणाले, नऊ वर्षांची दीर्घ सेवा, २० वर्षे सेवा, ३० वर्षे सेवा, विदेश सेवा, सैन्य सेवा, सामान्य सेवा, स्पेशल सर्व्हिस मेडल, लाँग सर्व्हिस अँड गुड कंडक्ट मेडल, मेरीटोरीयस मेडल, ग्राउंड मेडल, स्वातंत्र्याच्या ५० वर्षे निमित्त मेडल अशी अनेक प्रकारची ही मेडल असतात. ती बनविताना अतिशय काळजीपूर्वक बनवावी लागतात. त्यांचे वजन कमी जास्त होऊन चालत नाही. प्रत्येक मेडलचे चिन्ह वेगळे असते आणि खालच्या बाजूला पदक विजेत्याचे नाव कोरलेले असते.

Leave a Comment