मुंबई : सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा प्रसिध्द दिग्दर्शक आर बाल्की यांनी केली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री पूजा भट्ट झळकणार आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना 24 वर्षानंतर पडद्यावर पहायला मिळणार आहे. आर बाल्की यांनी बॅालिवूड अनेक प्रसिध्द चित्रपट दिले आहेत. ‘पा’, ‘इंग्लिश विंग्लिश’ ,’शमिताभ’, ‘पॅडमॅन’ , ‘मिशन मंगल’ असे एकाहून एक सुपहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले.
आर बाल्कींच्या आगामी चित्रपटात 24 वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल आणि पूजा भट्ट
‘आर बाल्की’ यांच्या दिग्ददर्शनातून तयार होणारा हा चित्रपट 2022 च्या सुरुवातीला रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट थ्रिलर अर्थातच थरारक असून त्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. सनी देओल व पूजा भट या कलाकारांसोबतच या चित्रपटात श्रेया धन्वंतरी आणि दुलकर सलमान हे प्रसिध्द कलाकार देखील झळकणार आहेत.
आर बाल्की हे पहिल्यांदा अशा प्रकारचा थ्रिलर म्हणजेच थरारक असा चित्रपट दिग्दर्शित करणार असून या चित्रपटासाठी ते खूप जास्त उत्साहित आहेत. चित्रपटाचे नाव अजूनही ठरलेले नाही आहे. पण लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकेकाळी गाजलेल्यांपैकी सनी देओल व पूजा भट या कलाकारांसोबत आपण काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे आर बाल्की यांनी सांगितले. शिवाय हा चित्रपट प्रेक्षकांना सुध्दा तितकाच आवडेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.