आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती; राज्यातील ५ मृत्यू डेल्टा प्लसमुळे नाही


मुंबई – डेल्टा प्लसच्या ५ रुग्णांचा राज्यात मृत्यू झाला आहे. पण या ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला असेल असे म्हणता येणार नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. काही जणांना कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही डेल्टा प्लसची लागण झाली आहे. रण काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. यानंतर मुंबईत तसेच अन्य जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एका वृत्तवाहिनीशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपेंनी डेल्टा प्लस रुग्णांच्या मृत्यूविषयी भाष्य केले आहे. राज्यातील ५ रुग्णांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाला आहे, असे म्हणता येणार नाही. या रुग्णांच्या भूतकाळाची माहिती काढण्यात येत आहे. सध्या राज्यात ८० टक्के डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत. यामधील डेल्टा प्लस व्हेरिअंटसचे ६६ रुग्ण आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात सध्या डेल्टाचे ८० टक्के रुग्ण आहेत. यामधून डेल्टाचे रुग्ण किती म्युटेट होत आहेत. डेल्टा प्लस ६६ रुग्ण झाले असतील तरी त्यांनी लस घेतली आहे का? त्यांना कुठे कोरोनाची लागण झाली? अशी सर्व माहिती घेत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर एकुण १८ लोकांना लसीकरण घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण ५ जणांचे मृत्यू झाले आहेत.