हार्दिक पांड्याचा नवा लुक व्हायरल

चेन्नई सुपरकिंग्सचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याचा नवा डॅशिंग लुक गेल्या महिन्यात व्हायरल झाल्यापासून क्रिकेटपटूंनीही त्यापासून प्रेरणा घेतल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडीयन्सचा ऑलराउंडर, धोनीचा चेला आणि जवळचा मित्र हार्दिक पांड्या यानेही धोनीच्या पावलावर पाउल टाकत अलीम हकीम कडून नवी हेअरस्टाईल करून घेतली आहे. त्याचा हा नवा लुक त्याच्या चाहत्यांना फारच भावला आहे. हार्दिकने स्वतःच त्याचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रीलंका दौऱ्यात २७ वर्षीय हार्दिकला शेवटचे खेळताना पाहिले गेले आहे. या दौऱ्यात त्याची कामगिरी अगदी निराशाजनक होती. आता तो आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळण्यासाठी युएई ला रवाना होणार आहे. श्रीलंकेहून परतल्यावर आणि युएईला जाण्याच्या अगोदर हार्दिकला वेगळी स्टाईल करायची होती. अर्थात हार्दिकने यापूर्वीही अनेकदा अलीम हकीम कडून वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून घेतल्या आहेत.

हार्दिकची नवी हेअरस्टाईल ‘ ड्रॅपर’ म्हणून ओळखली जाते. पत्नी नताशा हिनेही हार्दिकच्या नव्या स्टाईलची तारीफ केली आहे. मुंबई इंडीयन्सचा आयपीएल दुसऱ्या सत्रातला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स बरोबरच होणार आहे.