तालिबानींनी केले भारताचे कौतुक

अफगाणिस्थान मध्ये तालिबानचा धोका वाढत चालला आहे. राजधानी काबुल पासून ५० किमी वर पोहोचलेल्या तालिबानीं संघटनेचा प्रवक्ता मोहम्मद सुहैल शाहीन याने एएनआय बरोबर केलेल्या चर्चेत तालिबान्यांच्या पासून विविध देशांच्या दुतावासांना धोका नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भारतीय नागरिकांना तालिबानी निशाणा बनविणार नाहीत असेही म्हटले आहे.

शाहीनने भारताने अफगाणिस्तानात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले असून भारताने अफगाणी नागरिकांच्या हितासाठी आणि अफगाणिस्थानच्या विकासासाठी बांधलेली धरणे, पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केलेल्या योजना कायम राहतील असे म्हटले आहे. अफगाणी नागरिकांच्या आर्थिक समृद्धीसाठी अनेक योजना भारताने राबविल्या आहेत. अश्याच एका धरणावर अडकलेल्या दोन भारतीयांना एअर लिफ्ट करण्यात आल्याचे त्याने सांगितले. भारतीय दुतावासाला आमच्या काढून धोका होणार नाही असे यापूर्वीच स्पष्ट केल्याचे शाहीन म्हणाला.

काबुल मध्ये सत्तेवर आलो तर महिला अधिकारांचे रक्षण केले जाणार असल्याचे त्याने सांगितले. १९९६ ते २००१ या काळात सत्तेवर असताना तालिबानने कडक इस्लामी कायदे लागू केले होते आणि त्यात महिलांना कामावर जाण्यासा बंदी होती.