ब्लॅकमेल करण्यासाठी रशियाने सेक्स व्हिडीओ चोरले, इति बायडेन पुत्र हंटर

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन त्यांचे चिरंजीव हंटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वेश्येबरोबर केलेल्या संभाषणाची चर्चा आणि त्या संदर्भातला व्हिडीओ चर्चेत आला आहे. डेली मेलने या व्हिडीओचा आधार घेऊन हंटर बायडेन याच्या संदर्भात बातमी छापली आहे. या ऑडीओ व्हिडीओ मध्ये हंटर एका वेश्येबरोबर बोलताना, ‘ब्लॅकमेल करण्यासाठी रशियन लोकांनी सेक्स व्हिडीओ असलेला त्याचा लॅपटॉप चोरल्याचे’ सांगत आहे. ही चोरी लास वेगास मधील एका हॉटेलच्या खोलीत तो मद्याच्या नशेत असताना झाल्याचे हंटर सांगतो आहे.

अर्थात यापूर्वीही हंटरच्या रंगील्या रात्रींचे अनेक किस्से उघड झाले आहेत. डेली मेलच्या माहितीनुसार हंटरने आत्तापर्यंत तीन लॅपटॉप हरविले असून त्यातला पहिला डेलवेअरच्या कम्प्युटर स्टोअर मध्ये विसरला होता. दुसरा एफबीआय फेडरल एजंटनी सील केला होता. प्रत्येक लॅपटॉप मध्ये हंटरचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे.

जानेवरी २०१९ मध्ये एका वेश्येबरोबर सेक्स करत असताना त्याने कॅमेरा ऑन केला होता पण नंतर तो बंद केला नाही. या लॅपटॉपमधील वेश्येबरोबरचे संभाषण लास वेगास मध्ये रशियन ड्रग डीलरने ऐकले आणि हा लॅपटॉप चोरीला गेला असे समजते. या हॉटेलच्या एका पेंटहाउस मध्ये हंटरचा १८ दिवस मुक्काम होता. या पेंटहाउसचे रोजचे भाडे १० हजार डॉलर्स असून ही रक्कम जो बायडेन याच्या खात्यातून भागविली गेली होती असे म्हटले जाते.