राधिकाचा ‘तो’ फोटो पुन्हा व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे #BoycottRadhikaApte हॅशटॅग


आपल्या दमदार आणि हटके अभिनय शैलीसाठी अभिनेत्री राधिका आपटे ओळखली जाते. राधिकाने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली. चित्रपटांसोबतच राधिका तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी देखील ओळखली जाते. राधिकाला आपल्या बोल्ड अंदाजामुळे अनेकदा ट्रोल व्हावे लागलं आहे. सोशल मीडियावर राधिका पुन्हा एकदा चर्चेत आली आली असून ‘#BoycottRadhikaApte’ हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी राधिका आपटेच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली.

कोणत्याही नव्या चित्रपटामुळे किंवा फोटोमुळे नव्हे तर एका जुन्या चित्रपटातील सीनमुळे राधिकावर नेटकरी संतापले आहेत. २०१६ सालामध्ये राधिका आपटेच्या आलेल्या ‘पार्च्ड’ चित्रपटातील न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राधिका आपटे आणि अभिनेता आदिल हुसैन यांचा या चित्रपटात एक न्यूड सीन होता. या सीनची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. नेटकरी राधिकाला या सीनमधील त्या न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत. भारतीय संस्कती जपा, असे म्हणत नेटकऱ्यांनी राधिकासह बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड भारतीय संस्कृतीचा नाश करत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.


दरम्यान राधिकाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी राज कुंद्रा प्रकरणाशी संबध जोडला आहे. एक युजर म्हणाला, कठुआ प्रकरणात हिंदूना बदनाम करण्यात बॉलिवूडचा मोठा हात आहे. फरहान, तापसी, स्वरा वगैरे म्हणाले यांनी सीएए मुसलमानांच्या विरोधात असल्याचे म्हंटले होते. पण राज कुंद्राच्या प्रकरणावर सर्वांनी मात्र तोंड बंद ठेवल्याचे एक युजर म्हणाला.

तर राधिकाच्या न्यूड फोटोवर एक नेटकरी म्हणाला, “त्यांनी अश्लीलता पसरवली आहे. देशाच्या हितासाठी त्यांवर बहिष्कार घातला पाहिजे. दरम्यान, राधिका ‘पार्च्ड’ चित्रपटातील न्यूड सीन बद्दल म्हणाली होती, हे अजिबात सोपे नव्हते, कारण त्यावेळी मी माझ्या बॉडी इमेजला घेऊन चिंतेत होती. अशा परिस्थितीत न्यूड सीन देणे अत्यंत भयानक होते. आता मला माझ्या बॉडी शेप आणि साइजचा अभिमान आहे आणि मी आता कुठेही न्यूड सीन देऊ शकते, असे राधिका म्हणाली होती.