आता Vivo मोफत बदलून देणार फुटलेला डिस्प्ले


काही दिवसांपुवी भारतात विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y53s लाँच केला होता. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 64MP चा कॅमेरा, 5000mAh बॅटरी असे जबरदस्त फिचर दिले होते. विवो आता आपल्या निवडक स्मार्टफोन्सच्या खरेदीवर भन्नाट ऑफर्स देत आहे. यात वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एक्सटेंडेड वॉरंटी अश्या बेनिफिट्सचा समावेश आहे.

कंपनीने Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजमधील स्मार्टफोनच्या खरेदीवर अतिरिक्त बेनिफिट्स देण्यास सुरुवात केली आहे. 11 ऑगस्टपासून ही ऑफर सुरु झाली आहे आणि 23 ऑगस्टपर्यंत या ऑफरचा फायदा घेता येईल. या कालावधीत विकत उपरोक्त सीरिजमधील नवीन स्मार्टफोन विकत घेतल्यास युजर्संना कार्ड ऑफर्स, ईएमआय ऑफर्स, वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, मोफत लॅपटॉप बॅग आणि एक्सटेंडेड वॉरंटी मिळेल.

Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीजमधील स्मार्टफोन या ऑफरमुळे नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत विकत घेता येतील. तसेच खरेदी करताना HDFC, ICICI आणि Kotak Mahindra बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच या स्मार्टफोनचा डिस्प्ले खरेदीनंतर 6 महिन्यात फुटल्यास वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट अंतर्गत मोफत बदलून देण्यात येईल. तसेच 10 हजार रुपयांचे जिओ बेनिफिट्स देखील मिळतील.

ग्राहकांना 15 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास अश्योर्ड गिफ्ट मिळेल. या अश्योर्ड गिफ्टमध्ये लॅपटॉप बॅगचा समावेश आहे. 25 ऑगस्टपर्यंत 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा मोबाईल खरेदी केल्यास 6 महिन्याची मोफत एक्सटेंडेड वॉरंटी देण्यात येईल.