डेल्टा प्लसची १३ नवी व्हेरीयंट, पैकी पाच भारतात

करोनाचा जगभराला पडलेला विळखा अजूनही सैल झाला नसल्याचे दिसून येत आहे. करोनाने आत्तापर्यंत शेकडो वेळा रूप बदलले आहे. अतिशय वेगाने फैलावणाऱ्या करोना डेल्टा प्लस व्हेरीयंट ची १३ नवी रूपे आता समोर आली असून त्यातील पाच भारतात आढळली आहेत. भारतात १०० हून अधिक रुग्णात डेल्टा व्हेरीयंट सापडले आहे असे समजते.

जगातील बहुसंख्य देशात डेल्टाच्या नव्या व्हेरीयंटचे संक्रमण झालेले रुग्ण आढळत आहेत. वैज्ञानिकांच्या मते भारतातील वर्तमान स्थिती चिंताजनक नाही पण भविष्यात गंभीर होऊ शकते. हे व्हेरीयंट इतके प्रभावी आहे की लसीचे दोन्ही डोस घेतलेले आणि एकदा करोना होऊन गेलेल्या रुग्ण सुद्धा पुन्हा पोझिटिव्ह येत आहेत.

डॉ. विनोद यांच्या म्हणण्यानुसार डेल्टाचे नवे व्हेरीयंट अमेरिका आणि ब्रिटन मध्ये जास्त प्रमाणात आहे. भारतात डेल्टा, प्लस, एवाय २.०, एवाय ३.०, एवाय ५ मिळाले आहे. विशेष म्हणजे जगभरात या व्हेरीयंट मध्ये समानता दिसते आहे. आता नवीन जेवढी व्हेरीयंट सापडतील त्यांना डेल्टा प्लस हीच श्रेणी दिली जाणार आहे. अमेरिकेत हे व्हेरीयंट आक्रमक स्वरुपात दिसते आहे. भारतात सुद्धा त्याचा नजीकच्या काळात उद्रेक होऊ शकतो.