नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकार सीएनजीचा वापर वाढवण्यसाठी पावले उचलत असून त्यानुसार देशात अनेक ठिकाणी सीएनजी स्टेशनची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. देशात सर्वाधिक सीएनजी स्टेशन्सची संख्या गुजरातमध्ये आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण सीएनजी स्टेशनपैकी सर्वाधिक 25 टक्के सीएनजी स्टेशन गुजरात राज्यात आहेत.
गुजरातमध्ये देशातील सर्वाधिक सीएनजी स्टेशन, केंद्र सरकारची माहिती
केंद्र सरकार सीएनजीचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या देशात 3 हजार 94 सीएनजी स्टेशन्स आहेत. पुढील 10 वर्षात 8 हजारहून अधिक स्टेशन्स उभारले जातील, असा सरकारचा मानस आहे. सध्या देशात सर्वाधिक सीएनजी स्टेशन्स गुजरातमध्ये असून त्यांची संख्या 779 एवढी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 488, उत्तर प्रदेशमध्ये 485, तर राजधानी दिल्लीत 436 सीएनजी स्टेशन्स आहेत.