रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्ससंदर्भात निर्णय होण्याची शक्यता


मुंबई : आज रात्री उशिरापर्यंत मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेलला परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मॉलमधील रेस्टॉरंट आणि थिएटर्स मात्र बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, त्यांना मॉलमध्ये प्रवेश राहणार असल्याचे देखील कळते आहे. सध्या रेल्वे पाससाठी जो क्यूआर कोड वापरला जात आहे, तोच मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची देखील शक्यता आहे.

दरम्यान मंत्री अस्लम शेख यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे की, मुंबईत अनेक निर्बंध आणले होते, ते शिथिल केले आहेत. रेस्टॉरंटची वेळ 4 वाजेपर्यंत दिली आहे. पण ती वेळ 10 वाजेपर्यंत वाढवून देण्यात यावा अशी ही मागणी केली आहे. आजच्या कॅबिनेटमध्येही यावर चर्चा होऊ शकते आणि येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होईल. मॉलचाही प्रश्न आहे त्यात अनेक दुकान असतात, असे शेख म्हणाले.