इस्रोचा नवीन उपग्रह अंतराळातून ठेवणार देशावर नजर

भारताची अंतराळ संस्था इस्रोने देशाचा ७५ वा स्वातंत्रदिन तोंडावर आला असताना आज नवीन कीर्तिमान स्थापन केले आहे. पृथ्वीवर आणि देशावर देखरेख करणारा पहिला उपग्रह ईएसओ-०३ चे प्रक्षेपण इस्रो कडून केले जात असून त्याचा कौंटडाऊन सुरु झाला आहे. हे प्रक्षेपण यशस्वी ठरले तर भारताची ताकद जगात वाढणार आहे.

इस्रोने या संदर्भात ट्विटर वरून कौंटडाऊन सुरु झाल्याची माहिती दिली आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र, श्री हरीकोटा येथून जिओ सिंक्रोनन्स सॅटेलाईट लाँच व्हेईकल एफ १०- एएसओ-०३ प्रक्षेपण कौंटडाऊन सुरु झाला आहे, १२ ऑगस्ट च्या पहाटे ५.४३ मिनिटाने प्रक्षेपण होणार आहे असे यात म्हटले गेले आहे. अर्थात हवामान अनुकूल असेल तरच हे होऊ शकणार आहे. हा अतिप्रगत उपग्रह असून देशावर येणारी चक्रीवादळे, पूर यांचा धोका त्यामुळे अगोदर समजणार आहे.