ऑलिम्पिक, भारतीय मेडल विजेत्यांना गिफ्ट मिळणार शाओमीचा महागडा फोन

टोक्यो ऑलिम्पिकची सांगता होऊन सर्व देशांचे खेळाडू आपल्या देशांना परतले आहेत. भारतीय खेळाडू सुद्धा मायदेशी परतले आहेत आणि त्यांचा भव्य स्वागत सोहळा पार पडला आहे. ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूंना शाओमी त्यांचा सर्वात महाग फोन एमआय इलेव्हन अल्ट्रा गिफ्ट करणार असल्याची घोषणा कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी ट्विटर वर केली आहे. या फोनची किंमत ६९९९० रुपये आहे.

जैन यांनी त्यांच्या ट्विट मध्ये ‘सुपर फोन फॉर सुपर हिरोज’ असे लिहिले आहे. भारताने टोक्यो मध्ये १ सुवर्ण, दोन रजत आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली आहे. शाओमी चा हा नवा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट फिचर सह आहे. त्याला ६.८१ इंची डब्ल्यूक्यूएचडी प्लस ई फोर एमोलेड डिस्प्ले कॉर्निंग ग्लास व्हिक्टस सपोर्ट सह दिला गेला आहे. बॅक पॅनलवर १.१ इंचाचा दुसरा डिस्प्ले आहे.

१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या या फोन साठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यात ५० एमपीचा प्रीमियम कॅमेरा, ४८ एमपीचा अल्ट्रा वाईड आणि ४८ एमपीचा झूम सेन्सर असून सेल्फी साठी २० एमपीचा कॅमेरा आहे. हा फाईव्ह जी फोन आहे.