चित्रपटापासून दूर असूनही शमिता शेट्टीची इतकी आहे कमाई

पोर्न चित्रपट प्रकरणी अटकेत असलेला राज कुंद्रा आणि त्याची अभिनेत्री पत्नी शिल्पा सध्या चर्चेत आहेत तसेच शिल्पाची बहिण शमिता ही सुद्धा चर्चेत आली आहे. पोर्न प्रकरणात राज कुंद्राची पाठराखण केल्याने तिच्यावर दर्शक चिडले आहेत त्यातच तिची बिग बॉस ओटीटी वर एन्ट्री झाल्याने प्रेक्षकांनी निर्मात्यांना सुद्धा धारेवर धरले आहे.

गेली १२ वर्षे शमिता चित्रपटांपासून दूर असूनही तिची लाईफस्टाईल इतकी लॅव्हीश कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिल्पा शेट्टी अभिनेत्री आणि बिझिनेस वूमन आहे आणि त्यातून तिला कोट्यवधीची कमाई होते पण शमिताची मालमत्ता सुद्धा १० ते ५० लाख डॉलर्सची असल्याचे समजते. बिग बॉस दोन साठी तिने भक्कम रक्कम घेतली आहे असेही सांगितले जाते.

शमिता व्यवसायाने इंटिरीअर डिझायनर असून तिची गोल्डन लीफ इंटिरीअर्स ही कंपनी आहे. ब्रांड इंडोर्समेंट मधून सुद्धा शमिता चांगली कमाई करते शिवाय इन्स्टाग्राम स्पॉन्सर्ड पोस्ट मधून सुद्धा शमिता धो धो पैसे मिळविते असे सांगतात.

पदवी घेतल्यावर तिने फॅशन डिझाईनचे शिक्षण घेऊन काही काळ मनिष मल्होत्रा याच्यासोबत काम केले आहे. मनिषनेच तिला अभिनय क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला होता आणि २००२ मध्ये तिने मुहोब्बते चित्रपटातून बॉलीवूड एन्ट्री केली होती. गतवर्षी वेबसिरीज ब्लॅक विडो मध्ये ती दिसली होती.