भालाफेकी बाबत बरेच काही

टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात देशासाठी पहिले सुवर्णपदक मिळविले आणि भालाफेक या खेळाबाबत एकच चर्चा सुरु झाली. या खेळाबाबत फारशी माहिती किंवा चर्चा झालेली नाही. पण हा खेळ प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

भालाफेक ट्रॅक अँड फिल्ड, थ्रोइंग खेळ म्हटला जातो. यात लाकडी किंवा फायबरची दांडी किंवा पाईप, त्याच्या पुढच्या टोकाला हलक्या धातूपासून बनविलेले पाते जोडलेले असते. यामुळे भाला अधिक दुरवर फेकता येतो. यात पळणे, उडी मारणे आणि फेकणे असे तीन खेळ आहेत. हा मैदानी म्हणजे आउट डोर गेम आहे. पुरुषांच्या भालाफेकीला डीकॅथलॉन तर महिलांच्या भालाफेकीला हेप्टाथलॉन म्हणतात. दोन्ही एकच खेळ आहेत.

यात पुरुष खेळात भाल्याची लांबी २.५० मीटर तर महिलांसाठी भाल्याची लांबी २.३० मीटर पर्यंत असते. पुरुष भाल्याचे वजन किमान ८०० ग्राम तर महिला भाल्याचे वजन किमान ६०० ग्राम असते. याचे तीन भाग आहेत. जमिनीत घुसणारे टोकदार पाते, मग लाकूड किंवा मेटल पाईप आणि मध्ये ग्रीप. ग्रीप पकडून खांद्याच्या वर भाला धरून ३० मीटर लांबीच्या ट्रॅकवर पळत येऊन आखलेल्या सीमा लाईनच्या आधी भाला फेकला जातो. खेळाडूला ग्लोव्हज वापरता येत नाहीत मात्र जखम झाली असेल तर पट्टी लावता येते.

भाला फेकल्यावर तो जोपर्यंत हवेत आहे तोपर्यंत खेळाडूला रनवे वर थांबावे लागते आणि भाला फेकल्यावर जमिनीकडे पाठ करायची नसते. भाल्याचे टोक प्रथम जमिनीत घुसले पाहिजे असा नियम आहे. खेळाडू सहा वेळा भाला फेकू शकतो. त्यात जे सर्वाधिक अंतर असेल ते ग्राह्य घरले जाते.

पूर्वी ग्रीस मध्ये शिकार आणि युद्धात भाला फेकीची पद्धत होती नंतर त्याचे खेळात रुपांतर झाले. प्राचीन काळात भारतात सुद्धा युद्धात आणि शिकारीत भाले वापरले जात होते. ऑलिम्पिक मध्ये पुरुष भालाफेक १९०८ पासून तर महिला भालाफेक १९३२ पासून सुरु झाली. त्यात १९८६ मध्ये पुरुष भाला तर १९९९ मध्ये महिला भाला प्रकारात नवीन बदल करून भाल्याचे केंद्र ४ सेंटीमीटरने पुढे केले गेले.

चेको जान जेलेजनी इतिहासातील सर्वात मोठा पुरुष भालाफेक खेळाडू आहे. त्याने १९९२ ते २००० या काळात तीन वेळा ऑलिम्पिक चँपियनची हॅट्रिक केली आहे. त्याचे रेकॉर्ड ९८.४८ मीटर भालाफेक असे आहे.