नीरजचा इन्स्टाग्रामवर उदो उदो

भारतासाठी मैदानी खेळातील, भालाफेकीत,पहिले सुवर्णपदक मिळविलेला नीरज चोप्रा इंटरनेट मीडियावर सुद्धा वेगाने ट्रेंड होऊ लागला आहे. इन्स्टाग्रामवर नीरजचे २ लाख फॉलोअर्स होते. गेल्या दोन दिवसात ही संख्या अतिशय वेगाने वाढून आता त्याच्या फॉलोअर्सच्या संखेने ३० लाखाचा टप्पा गाठला आहे. त्याचे जुने फोटो, व्हिडीओ लाईक केले जात असून प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर आला आहे. नीरज देशातील तरुणाईचा प्रेरणास्रोत बनला आहे आणि सर्व देशवासियांना त्याचा अभिमान वाटतो आहे.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने इस्टाग्रामवर दिलेल्या प्रतिक्रियेत नीरजचे ऐतिहासिक विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन केले आहे.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सुद्धा हिच परिस्थिती आहे. नीरजची एका पोस्ट वेगाने व्हायरल झाली असून त्यात नीरज म्हणतो,’ यशाची इच्छा झोपू देत नाही, कष्टांशिवाय दुसरे काही चांगले वाटत नाही. सतत काम करूनही थकायला होत नाही. असे होईल तेव्हा नक्की समजा की तुमचे यश नवीन इतिहास लिहिणार आहे.’

यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने मोठी मार्मिक टिपण्णी केली आहे. युजर म्हणतो, ‘शेवटच्या दिवशी अखेर आर्मीला बोलवावे लागले. भालाफेक सोपी नाही. संयम, संतुलन, उर्जा, आहार याची त्यासाठी फार गरज आहे. मेहनत हवीच पण अनेक खेळाडू जखमा होतात त्यामुळे हार मानतात.’ नीरजने जखमी होऊन सुद्धा हार मानली नाही त्यामुळेच त्याला हे यश चाखता आले आहे.