इटलीतील शतायुषींचे गाव

इटलीच्या सार्दीनिया प्रांतातील पहाडी भागात असलेले पर्डासडेकोग हे १७४० वस्तीचे गाव सर्वाधिक शतायुषी व्यक्ती असलेले गाव बनले आहे. या गावात सध्या ८ लोक १०० पार केलेले आहेत तर या वर्षात आणखी ५ व्यक्ती १०० पार करणार आहेत. पुढच्या दोन वर्षात आणखी १० जण १०० ओलांडतील. त्यामुळे या गावाला वाढदिवसासाठी लागणाऱ्या मेणबत्त्यांचा सतत पुरवठा करावा लागतो असे सांगितले जाते. या वर्षी ५ शंभरी वाढदिवस म्हणून ५०० मेणबत्त्या लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार येथील ४-५ कुटुंबात काही मृत्यू झाले त्यानीही १०० पार केली होती. जगात शंभरी ओलांडलेल्या व्यक्तीची अधिक संख्या असणारे जे पाच विभाग आहेत त्यात इटलीचा सार्दीनिया भागात ५३४ व्यक्ती आहेत. हे प्रमाण १ लाख नागरिकांत ३७ शतायुषी नागरिक असे आहे.

इटली मध्ये शतायुषी नागरिकांची संख्या वाढत चालली असून २००९ मध्ये येथे ११ हजार शतायुषी होते ते २०२१ मध्ये १७९३५ शतायुषी आहेत. ताजी स्वच्छ हवा, सकस अन्न हे त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहेच पण त्याचबरोबर परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती हे सर्वात मोठे कारण आहे. या लोकांनी भूक, युद्धे यांच्याशी तोंड दिले आणि परिस्थितीशी जमवून घेतले आणि जीवन तणावमुक्त ठेवले असे सांगतात. पुस्तकांचे खूप वाचन हेही एक त्यांच्या तणावमुक्तीचे साधन आहे.

येथील वृध्द वृद्धाश्रमात नाही तर घरात राहतात. सामुदायिकतेची भावना, सतत संपर्कात राहणे यामुळे त्यांचे सामाजिक जीवन उच्च दर्जाचे आहे असेही सांगितले जाते.