हजारो वर्षांपुर्वी समुद्रात बुडाली आहेत ही 5 रहस्मयी शहरे


अनेक शतकांपुर्वी जगात अनेक मोठमोठी शहरे होऊन गेली. ही शहरं आज फक्त इतिहासाचा हिस्सा आहेत. ही शहरे समुद्रात खोल विलीन झाली. आज आम्ही तुम्हाला अशाच शहरांबद्दल सांगणार आहोत, जी रहस्मयी तर आहेत. मात्र खोल समुद्रात बुडाली आहेत.

हे सिंकदरचे शहर अलेक्जेंड्रिया (मिस्त्र) आहे. हे शहर 1500 वर्षांपुर्वी आलेल्या भुंकपामध्ये समुद्रात गायब झाले. पाण्यामध्ये या शहराचे अवशेष आजही आहेत. हे अवशेष या शहराचे अस्तित्व दर्शवतात.

हे खंभातचे हरवलेले शहर आहे. हे शहर 17 वर्षांपुर्वी खंभातच्या खाडी (भारत) मध्ये सापडले आहे. सांगण्यात येते की, हे शहर जवळपास 9500 वर्षांपुर्वी समुद्रात बुडाले. 2002 मध्ये या शहराचा शोध लागला. मात्र आजही हे एक रहस्यच आहे की, हे शहर कसे काय बुडाले ?

मिस्त्रमध्ये तुम्ही अनेक पिरामिड पाहिले असतील, मात्र समुद्रातील पिरामिड पाहिले आहे का जापानमध्ये काही वर्षांपुर्वी एक टुरिस्ट गाईडने समुद्राच्या आत असलेल्या या पिरामिडला शोधून काढले आहे. याला योनगुनी शहराच्या नावाने ओळखले जाते. सांगितले जाते की, हे शहर कधीकाळी पौराणिक महाद्विप होते.

हे मिस्त्रचे प्राचीन शहर हेरोस्लोइन आहे. हे शहर 1200 वर्षांपुर्वी समुद्रात बुडाले. इतिहासकार हेरोटोडस यांच्यानुसार, हे शहर अफाट संपत्तीसाठी प्रसिध्द होते. अनेकांना या ठिकाणी खजाना देखील सापडला आहे.

चीनच्या झेजियांगमध्ये देखील चेंग नावाचे एक शहर होते. हे शहर 1300 वर्ष जुने होते. मात्र 1959 मध्ये हे शहर खोल झऱ्यात बुडाले. याला लायन सिटी नावाने देखील ओळखले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शहराचे अवशेष आजही पाण्यामध्ये तसेच्या तसे आहेत.

Leave a Comment