1200 वर्षांपासून उतारावर उभा आहे हा दगड, कोणालाच समजले नाही यामागचे रहस्य


जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचे रहस्य आजपर्यंत कोणालाच समजलेले नाही. असेच एक रहस्य तामिळनाडूच्या महाबलिपूरममध्ये असलेल्या अती प्राचीन दगडाचे आहे. हा दगड कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही. हा दगड जवळपास 1200 वर्ष जुना असल्याचे समजले जाते.

हा रहस्मयी दगड 20 फुट उंच असून, 15 फुट रूंद आहे.  हा दगड अशा उतारावर आहे, जेथून सहज खाली गरंगळू शकतो. मात्र हा दगड हालत देखील नाही आणि खाली गरंगळत देखील नाही. महाबलिपूरममध्ये येणारे लोक या 250 टन वजनाच्या दगडाला बघून आश्चर्यचकित होतात. काही लोक या दगडाला श्रीकृष्णाच्या माखनाचा चेंडू असल्याचे देखील म्हणतात.

अशी मान्यता आहे की, श्रीकृष्ण लहान असताना, या ठिकाणी थोडे माखन सांडले होते. ते माखन आता एक विशाल दगड झाले आहे. या दगडाचा सर्वात प्रथम शोध  1908 ला लागला होता. सांगण्यात येते की, या दगडाला खाली खेचण्यासाठी सात हत्तींच्या मदतीने ओढण्यात आले होते. मात्र हा दगड इंचभर देखील हलला नाही.

या दगडाला या जागेवर व्यक्तीने उभे केले आहे की, निसर्गाद्वारेच या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. या दगडामागील रहस्य आजही कायम आहे.

Leave a Comment