विमान उडवण्याचा अनुभव येण्यासाठी हॉटेलमध्येच बसवले कॉकपिट


विमानात लाखो लोक प्रवास करत असतात. मात्र विमान उडवण्याबद्दल सामान्य प्रवाश्यांना काहीही माहिती नसते. टोकियोच्या हनेदा इंटरनॅशनल एअरपोर्टवरील हनेदा एक्सेल हॉटेलमधील एका रुममध्ये चक्क कॉकपिट बसवण्यात आले आहे. लोकांना विमान उडवण्याबद्दल माहिती देणयासाठी हे कॉकपिट बसवण्यात आले आहे. हॉटेलच्या रुममध्ये बसवण्यात आलेल्या या कॉकपिटमध्ये 90 मिनिटांचा सेशन असणार आहे. या रुमला ‘कॉकपिट रुम’ असे नाव देण्यात आले असून, 18 जुलैपासून या रुमचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.

हॉटेलच्या रूममध्ये बनवण्यात आलेल्या या कॉकपिटमुळे लोकांना  बोईंग 737-800 विमान उडवण्यासारखा अनुभव मिळणार आहे. तसेच मदतीसाठी एक इंस्ट्रक्टर देखील असणार आहे. चालवणाऱ्या व्यक्तीला सांगण्यात येईल की, त्यांचे विमान हे हनेदावरून ओसाकीच्या इतामी एअरपोर्टवर जाईल.

या कॉकपिटचा वापर करण्याचे भाडे जवळपास 30 हजार येन (19 हजार रुपये) असेल. पुर्ण रूम बुक करायची असेल तर यासाठी 25 हजार 400 येन (16 हजार रुपये) अधिक द्यावे लागतील.

हॉटेलचे पब्लिक रिलेशन मॅनेजर अकी हगीवारा यांनी सांगितले की, कॉकपिटला बनवण्यासाठी 63 लाख रुपये खर्च आला आहे. लोक याबद्दल वारंवार विचारपूस करत आहेत. यावरून अंदाजा लावता येईल की, यामध्ये बसणे किती उत्सुकतेचे असेल. हे कॉकपिट बनवण्याची आइडिया हॉटेलच्या जनरल मॅनेजरची आहे.

Leave a Comment