होय, या पालीची किंमत आहे ४० लाख रुपये


पाल हा किळसवाणा प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. या पालीच्या अनेक जाती आहेत. पण म्हणून कुणी पाली विकत घेत असेल अशी कल्पना करणे अवघड आहे. गीको नावाची पालीची एक जात अतिशय दुर्मिळ असून या पालीसाठी ४० लाख रुपये किंमत मोजण्याची तयारी असते हे नवल म्हणावे लागेल.

ही पाल टॉकके असा आवाज काढते त्यामुळे तिला टॉके असेही म्हटले जाते. ही पाल अनेक गुणांनी युक्त आहे. तिचे मांस अनेक प्रकारच्या औषधी बनविण्यासाठी वापरले जाते. द. पूर्व आशियाई देशात या मांसापासून नपुसंगत्व, मधुमेह, एडस व कॅन्सरवरची पारंपारिक औषधे बनविली जातात. पौरुषत्व वाढविण्यासाठीही औषधे बनविली जातात. चीनमध्ये पारंपारिक चीनी मेडिसिन मध्ये या पालीच्या मांसाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पालीची ही जात दुर्मिळ आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या पालीसाठी लाखात किंमत मोजली जाते. या प्रकारची पाल ४० लाखाला विकली गेल्याची नोंद आहे.


या पाली द. पूर्व आशिया, भारतात बिहार, इंडोनेशिया, बांग्लादेश, पूर्वोत्तर भारत, फिलिपिन्स व नेपाळ मध्ये आढळतात. त्या प्रामुख्याने जंगली आहेत पण या सर्व भागात जंगले नष्ट होत चालल्याने या पाली नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Leave a Comment