टोकियो – भारताच्या अदिती अशोकचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्फमधील आव्हान संपुष्टात आले आहे. थोडक्यात अदितीचे पदक हुकले असून ती चौथ्या नंबरवर राहिली. ऑलिम्पिकमध्ये अदिती अशोक भारताकडून सर्वोत्तम खेळी करणारी गोल्फर झाली आहे. शेवटच्या शॉटपर्यंत अदिती पदकाच्या शर्यतीमध्ये होती. पण शेवटी अटीतटीच्या लढतीत अदिती पदकापासून वंचित राहिली. गोल्फमधील सुर्वणपदक अमेरिकेच्या खेळाडूने जिंकले आहे.
Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्फमधील भारताचे आव्हान संपुष्टात
भारताच्या अदिती अशोक या खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून दमदार खेळी करत या खेळ प्रकारात भारताला पदकाच्या जवळ नेले होते. भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोकने अंतिम फेरीत दमदार खेळी केली. गोल्फ सारख्या हायप्रोफाईल खेळात भारतीय खेळाडूची ताकद अभिमानास्पद आहे. अदिती अशोकच्या या कामगिरीमुळं गोल्फ प्रकाराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.