WhatsApp च्या माध्यमातून अशा प्रकारे डाउनलोड करा तुमचे लसीकरण सर्टिफिकेट


परदेशी किंवा देशाअंतर्गत प्रवास करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर कोरोन लसीकरणाचे सर्टिफिकेट तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. आतापर्यंत कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोविन पोर्टल आणि दुसरे म्हणजे आरोग्य सेतु अॅप. आता सर्वांसाठी कोरोना लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करणे ही प्रक्रिया अधिक भारत सरकारने सोपी केली आहे. त्यानुसार आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे.

MyGov कोरोना हेल्पडेस्क WhatsApp चॅटबॉट तुम्ही डाऊनलोड करु शकता. भारत सरकारने गेल्या वर्षाच्या सुरुवातीला याची घोषणा केली होती. जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला होता. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोरोना लसीकरण सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करावे याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  • सर्वात प्रथम तुम्हाला MyGov Corona Helpdesk WhatsApp क्रमांक +91 9013151515 तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करावा लागेल.
  • फोन क्रमांक सेव्ह झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅप सुरु कराल.
  • चॅट लिस्टमध्ये MyGov Corona Helpdesk WhatsApp क्रमांक सर्च करा.
  • आता तुम्ही चॅट सुरु करा.
  • देण्यात आलेल्या ठिकाणी Download Certificate टाइप करा.
  • WhatsApp चॅटबॉट पुन्हा तुम्हाला रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवेल.
  • OTP वेरिफाय करा आणि तो दाखल करा.

आता चॅटबॉट तुमचे कोरोना लसीकरण सर्टिफिकेट तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे लसीकरण सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे. जर चॅटबॉट सर्वर Error दाखवत असेल तर तुम्हाला अधिकृत कोविन पोर्टवर किंवा आरोग्य सेतूच्या संकेतस्थळावरुन ते डाऊनलोड करता येईल.