आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 28 तासांसाठी HDFC बँकेच्या ‘या’ सेवा बंद


मुंबई – एचडीएफसी बँकेच्या काही सेवा 28 तासांसाठी बंद राहणार आहेत. यामुळे नेट आणि मोबाईल बँकिंगवर ग्राहकांना काही सुविधा मिळू शकणार नाहीत. आज, 7 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून 8 ऑगस्ट रात्री 10 वाजेपर्यंत या सेवा बंद राहतील. या सेवा शेड्युल्ड मेटनन्ससाठी बंद राहणार असून याबद्दल बँकेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. बँकेने यासंदर्भातील माहिती ई-मेलद्वारे आपल्या ग्राहकांना दिली आहे. यात एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅप्सवरुन काही सेवांचा लाभ घेता येणार नसल्याचे म्हटले आहे.

मोबाईल किंवा नेट बँकिंगवरुन सेवा बंद असलेल्या कालावधीत क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. त्याचबरोबर 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही सेवा घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा लाभ घेणाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे.

दरम्यान, Cardless Cash ची सुविधा एचडीएफसी बँकेने सुरु केली असून याद्वारे एटीएम कार्ड नसतानाही तुम्हाला एचडीएफसी बँकेतून 24X7 रोख रक्कम काढता येईल. एटीएम/डेबिट कार्डशिवाय अत्यंत सुरक्षित मार्गाने पैसे काढता येतील, असे एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.