Tokyo Olympics : इराणच्या पैलवानाला आस्मान दाखवत बजरंग पूनियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश


टोकियो : क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त डाव टाकत भारताचा पैलवान बजरंग पूनियाने इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मान दाखवले. बजरंगने प्री क्वार्टरमध्ये अटीतटीच्या सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये समोरच्या पैलवानाला लोळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता पदकापासून बजरंग केवळ एक पाऊल दूर आहे. एकाच मूव्हमध्ये बजरंग पूनियाने विरोधी पैलवानाला चित केले.

इराणच्या मुर्तजाला हरवून तो सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आजच त्याचा सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासून बजरंग पूनियाला पदकाचा दावेदार मानला जात आहे. बजरंग पूनियाकडे भारताला कुस्तीतील पहिले सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये बजरंगने किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवेला हरवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

कुस्तीपटू सीमा बिसलाचे आव्हान संपुष्टात
दूसरीकडे टोकियो ऑलिम्पिकमधील भारताची कुस्तीपटू सीमा बिसलाचे आव्हान संपुष्टात आले आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये हरल्यानंतरही सीमा बिसला कांस्य पदकाच्या शर्यतीत होती. पण सीमाला ज्या रेसलरने हरवले होते, ती रेसलर फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे सीमा बिसलाचे आव्हान देखील संपुष्टात आले. भारताला आता कुस्तीत बजरंगकडूनच पदकाची अपेक्षा आहे.