सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्डचा लग्झरी अवतार, किंमत ३५ लाख

सॅमसंग त्यांचे नवे गॅलेक्सी झेड फोल्ड आणि झेड फ्लिप ३ हे फोन ११ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. त्यापूर्वीच लग्झरी कंपनी कॅव्हीअरने या स्मार्टफोनची अल्ट्रा प्रीमियम व्हेरीयंट पेश केली आहेत. या फोनवर हिरे, माणके आणि मौल्यवान रत्ने जडविली गेली आहेत.

सॅमसंग फोल्डिंग स्मार्टफोन प्रथमच सादर करत आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड ३ व झेड फ्लिप ३ हे फोन कॅव्हीयरने मॉडीफाय करून नव्या स्वरुपात पेश केले आहेत. गॅलेक्सी झेड फोल्ड ३ ची किंमत ३५ लाख तर झेड फ्लिपची किमंत ८ लाख रुपये आहे. ११ ऑगस्ट पासून हे दोन्ही फोन कॅव्हीयरच्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

फ्लिप तीन हा तीन नवीन डिझाईनमध्ये येत असून गोल्डन व्हायोलेट, पर्ल रोज आणि पार्क बेन्क्वेट अशी ही तीन व्हेरीयंट आहेत.तो कॅटरीना कॅलेव्हीश नावाने बाजारात येत आहे. त्यावर ४१९ मुल्यवान रत्ने जडविली गेली असून स्कल डिझाईन आहे. यात हिरे, सफायर, व्हाईट होल्डचा वापर केला गेला आहे. या फोनची फक्त २० युनिट बनणार आहेत. बीटकॉइन देऊन सुद्धा हा फोन खरेदी करता येणार आहे.

झेड फोल्ड ३ सुद्धा तीन व्हेरीयंट मध्ये असून त्याची ८० युनिट बनविली गेली आहेत. त्याची बॉडी टायटेनियम ची असून मागच्या बाजुला स्कल असून त्यात खोपडी टायटेनियमची आहे. खोपडी मध्ये डोळ्याच्या जागी माणके बसविली गेली आहेत.