Tokyo Olympics : विनेश फोगाटचा बेलारुसच्या महिला कुस्तीपटूकडून धक्कादायक पराभव


टोकियो : कांस्यपदकावर शिक्कामोर्तब करत भारतीय हॉकी संघाने दिवसाची शानदार सुरुवात केल्यानंतर लगेच भारताला कुस्तीत निराश व्हावे लागले. कारण पदकाची दावेदार मानल्या जात असलेल्या विनेश फोगाटला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. बेलारुसच्या महिला कुस्तीपटूने तिला 9-3 असे नमवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

क्वार्टर फायनल विनेश फोगाटने गमावल्यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे. फ्री स्टाइलमध्ये विनेश फोगाटकडून पदकाची अपेक्षा होती, कारण ती या गटात नंबर एकवर होती. विनेश त्या खेळाडूंमध्ये होती, जिने टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले होते. आज हार पत्कारावी लागली असली, तरी विनेशकडे अद्याप कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.