आपली शेजारी राष्ट्रे कधी साजरा करतात स्वातंत्र दिवस?

भारताला यंदा स्वातंत्र मिळून ७५ वर्षे होत असून आपला स्वातंत्र दिवस १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र भारताची स्थापना झाली पण ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र होताना फाळणीचे चटके आपल्याला सोसावे लागले. १५ ऑगस्टच्या एक दिवस अगोदर पाकिस्तानची निर्मिती झाली त्यामुळे पाकिस्तानचा स्वातंत्रदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा होतो.

आपले शेजारी राष्ट्र भूतान यांचा स्वतंत्रदिन १७ डिसेंबर रोजी साजरा होतो. तिबेटच्या कामरूप शासनाखाली काही काळ काढल्यावर १७ डिसेंबर १९०७ रोजी वांगचुक वंशाने पुन्हा सत्ता मिळविली होती. शेजारी बांग्लादेशचा स्वतंत्रदिवस २६ मार्च रोजी असतो. यंदा त्यांचा ५० वा स्वतंत्र दिन होता. शेख मुजीबुर रेहमान यांनी देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा केल्यावर ९ महिन्यांच्या संघर्षांनंतर त्यांना या दिवशी स्वातंत्र मिळाले. पाकिस्तानबरोबरच्या या युद्धात भारताने मदत केली होती.

चीनचा स्वातंत्रदिवस १ ऑक्टोबर हा आहे. १ ऑक्टोबर १९४९ याच तारखेला शियान्मेन चौकात सेंट्रल पीपुल्स पक्षाचे सरकार स्थापन झाले. या सरकारची स्थापना त्यापूर्वीच झाली होती पण सरकारचे काम या दिवशी सुरु झाले. म्यानमारचा स्वातंत्र दिवस ४ जानेवारी रोजी साजरा होतो. ४ जानेवारी १९४८ मध्ये हा देश स्वतंत्र झाला तेव्हा त्याचे नाव बर्मा होते. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने बर्मा मधूनच भारतात प्रवेश केला होता असे सांगतात.