आसाम सरकारचे बॉक्सर लवलीनाला अनोखे गिफ्ट


गुवाहाटी: भारतीय बॉक्सर लवलिनाने महिला बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. लवलीनाने या विजयासह इतिहास रचला असून भारताचे आणखी एक पदक निश्चित केले आहे. ती आज पदकाचे रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली.

तिच्या या कामगिरीनंतर तिला एक अनोखे गिफ्ट आसाम सरकारने दिले आहे. तिच्या घरापर्यंत जाणारा पक्का रस्ता सरकारकडून तयार करण्यात आला आहे. स्थानिक आमदार बिस्वजीत फूकन यांनी लवलीनाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता बनवून घेतला आहे. याबाबत माहिती देताना लवलीनाचे वडील टिकेन यांनी सांगितले की, आता तिने पदक जिंकले आहे. तर सरकारने रस्ता बनवला आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, कारण हा रस्ता म्हणजे लवलीना आणि आमच्या गावासाठी एक पुरस्कारच आहे.