Tokyo Olympics : कुस्तीपटू दीपक पुनिया, रवि दहियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश


टोकियो : भारताने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये आशादायक सुरुवात केली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा फायनलमध्ये गेल्यानंतर कुस्तीत देखील भारताच्या कुस्तीपटूंनी शानदार यश मिळवले आहे. आपापल्या गटात भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियाने शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची कुस्तीपटू अंशू मलिकला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

रवि दहिया विरुद्ध कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोस उरबानो यांच्यातील पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविने शानदार विजय मिळवला. रवि दहियाने हा सामना जिंकत प्री क्वार्टर फायनल सामन्यात बाजी मारली आहे. हा सामना रविने एकतर्फी जिंकला. त्याने कोलंबियाच्या कुस्तीपटूचा 13-2 असा पराभव केला. या गटात रविकुमारने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायललमध्ये त्याने बलगेरियाच्या कुस्तीपटूला 14-4 असे पराभूत करत पुढची फेरी गाठली. सेमिफायनलमध्ये तो पाकिस्तानच्या खेळाडूशी लढणार आहे.

तर दीपक पुनियाने पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो गटात प्री क्वार्टर सामन्यात नायजेरियाच्या एकरेकेम एगियोमोरला 13-1 असे हरवत क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या कुस्तीपटूशी झालेल्या सामन्यात दीपकने रोमांचक विजय मिळवला. त्याने चीनच्या खेळाडूचा 6-3 असा पराभव केला. शेवटच्या दहा सेकंदात 3-3 अशी बरोबरी असताना दीपकने तीन पॉईंट घेत 6-3 अशी आघाडी घेत शानदार विजय मिळवला. तर महिला फ्रीस्टाइल 57 किलोगटात अंशु मलिकला बेलारुसच्या इरिना कुराचिकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.