Tokyo Olympics : सेमीफायनलमध्ये लवलिनाचा पराभव तरी देखील देशासाठी जिंकले कांस्यपदक


टोकियो : भारतीय बॉक्सर लवलिनाने महिला बॉक्सिंगमध्ये इतिहास रचला आहे. भलेही तिचा सेमिफायनलमध्ये पराभव झाला असला तरी तिने देशासाठी पदक जिंकले आहे. लवलीनाचा तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने पराभव केला. जबरदस्त कामगिरी करत लवलीनाने क्वार्टर फायनल जिंकली होती. लवलीनाने या विजयासह इतिहास रचत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले होते. ती पदकाचे रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी आज मैदानात उतरली होती. पण पदकाचा रंग बदलण्यात तिला यश मिळालं नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारताच्या लवलीनाने क्वार्टर फायनल सामन्यात चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेन ला 4-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. लवलीनाने याआधी जर्मनीच्या अनुभवी Nadine Apetz ला पराभूत केले होते. आता लवलीनाने आपलं पदक निश्चित केले आहे. लवलीनाने आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. जरी ती सेमीफायनलमध्ये पराभूत झाली असली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे. 69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. पण यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

मोठ्या संघर्षातून हे यश आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलीनाने मिळवले आहे. या भागात लवलीना खूप लोकप्रिय आहे. लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकटाचा सामना करत लवलीनाने ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

माइक टायसनची स्टाईल लवलीनाला आवडते, तर मोहम्मद अली देखील तेवढेच आवडतात. पण तिने आता या दोघांप्रमाणेच आपली वेगळी ओळख बनवली आहे. 2018 मध्ये लवलीनाने दिल्लीत आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर रशियात आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये लवलीनानं पुन्हा कांस्यपदक जिंकले होते.

2 ऑक्टोबर 1997 रोजी लवलीना बॉरगोहेनचा जन्म झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी, तर आई गृहिणी आहेत. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी असून लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किकबॉक्सिंगमध्ये आली.

लवलीनासाठी ऑलिम्पिकच्या आधीचे काही दिवस खूप कठिण होते. ऑलिम्पिकआधी सर्व खेळाडू ट्रेनिंगमध्ये असताना लवलीना मात्र बॉक्सिंगपासून दूर होती. लवलीनाच्या आईची कीडनी ट्रान्सप्लांट सर्जरी या काळात झाली. ही सर्जरी झाल्यानंतर लवलीना ट्रेनिंगसाठी परतली.